Friday, November 14, 2025
Homeराजकीय घडामोडीसुप्रिया सुळेंवर अर्वाच्च भाषेत टीका... अब्दुल सत्तार यांच्या घरावर दगडफेक

सुप्रिया सुळेंवर अर्वाच्च भाषेत टीका… अब्दुल सत्तार यांच्या घरावर दगडफेक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली. यामुळे संभाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रोझाबाग येथील अब्दुल सत्तार यांच्या बंगल्यावर दगडफेक केली आहे. या सत्तार यांच्या बंगल्याच्या काचा फुटल्या आहेत. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील मिळाली आहे.



कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना सत्तार यांची जिभ घसरली. सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली.

अब्दुल सत्तार यांना 50 खोके मिळाले का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना सत्तार म्हणाले, तुम्हालाही 50 खोके द्यायचे का? तसेच इतकी भिकार@# झाली असेल तर तिलाही देऊ. अशा एकेरी भाषेत आणि अर्वाच्य भाषेत अब्दुल सत्तार यांनी टीका केली. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -