Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूरमध्ये हर हर महादेव चित्रपटाला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा विरोध

कोल्हापूरमध्ये हर हर महादेव चित्रपटाला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा विरोध

हरहर महादेव या चित्रपटाला कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने गुरुवारी दुपारी विरोध दर्शवण्यात आला.
येथील जुन्या शाहू चित्रमंदिरासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडचे कार्यकर्ते ही उपस्थित होते.

यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक यांच्या विरोधातही जोरात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर चित्रमंदिर व्यवस्थापनाने हा चित्रपट लावणार नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, शहर प्रमुख रवीकिरण इंगवले, स्मिता सावंत यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -