Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; किल द बेबी गर्लसाठी चलती-फिरती केंद्र

कोल्हापूर ; किल द बेबी गर्लसाठी चलती-फिरती केंद्र

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नकोशीला जगात येण्यापूर्वीच नाहीशी करण्यासाठी पुरोगामी म्हणवणाया कोल्हापुरातही अजब फंडे वापरले जात आहेत. सहज हालविता येणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशिन व्हॅनमध्ये बसवून स्त्रीबीज हत्येची सेवा घर पोहच सुरू आहे. दवाखान्यात व व्हॅनमधून फिरती अशी 40 हून अधिक सोनोग्राफी केंद्र जिह्यात कार्यरत आहेत. यासह शहरपरिसरासह जिह्यातील अनेक सामान्य दर्जाच्या दवाखान्यात वंशाच्या दिव्यासाठी होणारी गर्दी संशयास्पद आहे. कायद्याच्या कचाटय़ात सहिसलामत सुटून चालणाया किल द बेबी गर्ल सहीस सेंटरला चाप लावण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.



कोल्हापुरात लेक वाचवा आंदोलन झाली. समाजसेवी संस्थांनी प्रबोधनाचा जागर केला. जोडीला सायलेन्ट ब्जर्व्हर यंत्रणा आली. प्रशासकीय यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला. यानंतर काही अंशी चाप बसला. कालातरांने यंत्रणा ढिली पडली. स्त्रीभ्रुण हत्येसाठी थाटलेल्या दुकानदारांनी नवीन फंडे आणले आहेत. वंशाला दिवा पाहिजे ही वाढलेली मानसिकता आणि त्यासाठी भरमसाठ मोल घेवून उपलब्ध असणारी यंत्रणा अशी दुतर्फी गरज असल्यानेच हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. कोल्हापूर जिह्यात सुमारे 400 अधिकृत सोनोग्राफी सेंटर आहेत. तर 40 हूनअधिक सोनोग्राफी मशिन्स् बेकायदेशीर असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

कसबा बावडा, कागल, कर्नाटक सिमावर्ती भाग, इस्लामपूर, करवीर तालुक्यातील पश्चिम भागातील काही गावांत राजरोजपणे गर्भलिंग चाचणी केली जाते. नोंदणीकृत सोनोग्राफी मशिन दिखाव्यासाठी ठेवून अवैध मार्गाने देशात आणलेली (अॅस्मेलब्ड) व सायलेन्ट ऑब्जव्हर न बसविलेली सोनोग्राफी मशिनवर गर्भलिंग चाचण्या केल्या जातात. या पारंपारिक पळवाटेला आता अत्याधुनिक यंत्रणेची जोड दिली जात आहे. टुथब्रश व लॅपटॉपच्या आकाराचे पोर्टेबल अल्ट्रासाऊंड मशिन्स व यंत्रणा व्हॅनमध्ये ठेवून घरात किंवा सुरक्षित स्थळी येवून गर्भलिंग चाचणी केली जाते. चाचणीत मुलगी असल्याचे सिध्द झाल्यास घरीच गर्भपाताचे सोपस्कार पूर्ण करणारी यंत्रणा सध्या कोल्हापुरात पुन्हा सक्रिय झाली आहे. शहरातील काही दवाखान्यात सकाळपासून भली मोठी रांग असते. हमखास मुलगा होणार अशी खात्री येथे दिली जाते. पहिली मुलगी झालेल्या झोडप्यांची अधिक असते. पहिली प्रसुती याच दवाखान्यात झालेल्या जोडप्यांना येथे प्राधान्यक्रम दिला जातो. भ्रूण हत्याकेंद्राची माहिती घेवून कायद्याच्या चौकटीत शिक्षा करण्याचे धाडस यंत्रणा दाखविणार काय हा खरा सवाल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -