ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरज सलगरे रस्ता रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपूल जवळ आज दुचाकी आणि लोखंडी अँगल वाहतूक करणारा ट्रक ट्रेलरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या दुचाकी वरून प्रवास करणाऱ्या एका लहान मुलाच्या अंगावरून ट्रक टेलर गेल्याने जागीच ठार झाला तर दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झाला आहे हा अपघात झाल्यानंतर बघ्याची गर्दी झाली होती दुचाकी वाहना वरून सुधाकर सूर्यवंशी राहणार जमगी आणि एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा मिरजे कडून सलगरे गावच्या दिशेने जात होता त्याच वेळी लोखंड वाहतूक करणार ट्रक ट्रेलर हा रत्नागिरी नागपूर सर्व्हिस रस्त्याने पंढरपूर कडून सांगलीच्या दिशेने जात होता उड्डाण पूल जवळ आल्यानंतर दुचाकी वाहन ट्रक ट्रेलरचा अपघात झाला
मुलाच्या अंगावरुन चाक गेल्याने जागीच ठार झाला तर सुधाकर सूर्यवंशी यांच्या दोन्ही पायावरून चाक गेल्याने गंभिर जखमी झाले आहेत जखमीला मिरज शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय राज्य महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही या राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या सर्विस रस्त्यावर चुकीच्या पद्धतीचे दिशादर्शक फलक लावल्यामुळे या ठिकाणी सहा ते आठ अपघात आजपर्यंत झालेले आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अपघात रोखण्यासाठी जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा सर्विस रोड बंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे