Friday, November 22, 2024
Homeमनोरंजनचर्चांना फूलस्टॉप! 'Hera Pheri 3' मधून Akshay Kumar बाहेर, म्हणाला - 'मी...

चर्चांना फूलस्टॉप! ‘Hera Pheri 3’ मधून Akshay Kumar बाहेर, म्हणाला – ‘मी या चित्रपटाचा भाग नाही’

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाची त्याचे चाहते नेहमी आतुरतेन वाट पाहत असतात. अक्षय कुमारच्या लोकप्रिय फ्रँचायझीमधील हेर फेरी 3 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार या चित्रपटामध्ये दिसणार नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. स्वत: अक्षय कुमारने या चित्रपटातून माघार घेतली असल्याचे जाहीर केले आहे. अक्षय कुमार या चित्रपटामध्ये दिसणार नसल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत.

नुकताच अक्षय कुमारने हिंदुस्तान टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने हेरा फेरी 3 चित्रपटामध्ये तो दिसणार की नाही या प्रश्नावर उत्तर दिले. अक्षय कुमारने सांगितले की, ‘हेरा फेरी 3′ या चित्रपटाचा आता मी भाग नाही. मला या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली होती. पण या चित्रपटाचे कथानक मला फारसे आवडले नाही त्यामुळे मी या चित्रपटाच्या टीममधून बाहेर पडलो. प्रेक्षकांना जे पाहायला आवडेल तेच करायला मला आवडते. त्यामुळेच मी या चित्रपटामधून माघार घेतली आहे.’ असे सांगत अक्षय कुमारने या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिले आहे.

यावेळी अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांची देखील माफी मागितली आहे. कारण अक्षय कुमार या चित्रपटामध्ये दिसणार नसल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. अक्षय कुमारने सांगितले की, ‘हेरा फेरी 3′ हा चित्रपट करत नसल्याचे मला दु:ख आहेच. पण मी तुमची फसवणूक करणार नाही. मला माफ करा.’ असे म्हणत त्याने आपल्या चाहत्यांची माफी मागितली. आता हेरा फेरी 3 या चित्रपटामध्ये अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन राजूच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारने हेरा फेरी 3 या चित्रपटासाठी 90 कोटी रुपये मानधनाची मागणी केली होती. अक्षय कुमारचे मानधन हे जास्त होते. अशामध्ये कार्तिक आर्यन या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 30 कोटी रुपयांमध्ये तयार झाला होता. त्यामुळे या चित्रपटासाठी अक्षय कुमारऐवजी कार्तिक आर्यनची निवड निर्मात्यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -