कोडोली ता. पन्हाळा येथील कोडोली- बोरपाडळे राज्यमार्गांवर वाण्याच्या वगळीजवळ आज शुक्रवार दि. १८ रोजी पहाटे ५ वा. मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या वृद्धास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. सहदेव राजाराम कदम (वय ६५) रा.डवरी गल्ली कोडोली असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे.
कोडोली डवरी गल्लीतील सहदेव कदम हे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले असता कोडोली बोरपाडळे रस्त्यावरील वाण्याची ओघळ येथील वळणावर कदम यांना पाठीमागून अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने त्यांच्या डोक्यात व छातीस जबर मार लागल्याने रस्त्यावर पडले होते. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेले नागरिक यांनी कदम यांना तातडीने उपचारासाठी कोडोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाले आहे. कदम यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुले असा परिवार आहे.