Sunday, December 22, 2024
Homeजरा हटकेUrfi Javed ने पुन्हा केला कहर, ‘मोबाईल चार्जर ब्रा’ घातलेला व्हिडिओ केला...

Urfi Javed ने पुन्हा केला कहर, ‘मोबाईल चार्जर ब्रा’ घातलेला व्हिडिओ केला पोस्ट!

सोशल मीडिया (Social Media) सेन्सेशन अर्थात अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) या नाही तर त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. आपली हटके ड्रेसिंग स्टाईल आणि फोटोशूटच्या माध्यमातून उर्फी जावेद सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. रोज विचित्र कपडे परिधान करुन त्यावर काढलेले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती सर्वांची झोप उडवून टाकण्याची एकही संधी सोडत नाही. कोणाच्याही डोक्यात येणर नाही अशाप्रकारच्या कपड्यांची स्टाईल ती करत असते. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपासून ती कपडे तयार करुन ते परिधान करत असते. सध्या उर्फीने तिच्या नवीन आणि अतरंगी ड्रेसमधील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये उर्फीने तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिचा हा व्हिडिओ (Urfi Javed New Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उर्फी जावेदने आतापर्यंत सिमकार्ड, कधी ब्लेड, कधी सेफ्टी पिन, कधी वायर, कधी सॅक, कधी दोरी तर कधी काच यापासून तयार केलेले कपडे परिधान करुन फोटोशूट केले. या कपड्यांमध्ये उर्फीला पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते. पण आता उर्फीने कहर केला आहे. कारण उर्फीने चक्क मोबाईल चार्जर ब्रा परिधान केली आहे. तिच्या या नवीन ब्राने सर्वांचे लक्ष वेधेले आहे. उर्फीला या आइडिया कुठून सुचतात असा प्रश्न तिने नुकताच परिधान केलेली ब्रा पाहून सर्वांना पडला आहे.

उर्फीची मोबाईल चार्जर ब्रा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिने आपल्या अंगावर कपडे नाही तर चक्क दोन माबाईल आणि चार्जरचा वापर करुन तयार केलेली ब्रा घातली आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा नवीन लूकमधील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने अंगावर फक्त दोन मोबाईल चार्जरद्वारे लटकलेली ब्रा घातल्याचे दिसत आहे. या ब्रावर उर्फीने निळ्या रंगाचा ब्लेझर आणि पॅन्ट परिधान केल्याचे दिसत आहे.

उर्फी जावेदने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत कॅप्शनमध्ये “फुल चार्ज्ड”, असे लिहिले आहे. तिने पोस्टला दिलेले कॅप्शन देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उर्फीचा हा नवा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्फीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना आवडला पण नेटिझन्स तिला चांगलेच ट्रोल करत आहेत. ‘उर्फी वेडी झाली आहे’, ‘तिने मर्यादा ओलांडल्या आहेत’, ‘उर्फी दीदी माझा फोनही चार्ज कर’, अशाप्रकारच्या कमेंट्स युजर्स करताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -