Monday, December 23, 2024
HomeमनोरंजनSushmita Sen Birthday : 2 मुलींची आई आहे फॅशन आयकॉन सुष्मिता सेन,...

Sushmita Sen Birthday : 2 मुलींची आई आहे फॅशन आयकॉन सुष्मिता सेन, ललित मोदींसोबतच्या अफेअरमुळे सध्या चर्चेत!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉलिवूडशिवाय जगभरात फॅशन आयकॉन मानली जाणारी अभिनेत्री सुष्मिता सेन आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मिता सेनने आपल्या सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली आहे. सुष्मिताने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता. त्यावर्षी ती ‘मिस युनिव्हर्स’ देखील झाली होती. सुष्मिता सेनने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सध्या ती ‘ताली’ वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. सुष्मिता सेनच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या आयुष्याशीसंबंधित काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत….



हैदराबादमध्ये जन्मली सुष्मिता –
19 नोव्हेंबर 1975 रोजी हैदराबादमध्ये सुबीर सेन आणि शुभ्रा सेन यांच्या घरामध्ये एका गोंडस मुलीचे आगमन झाले. त्यांनी तिचे नाव सुष्मिता असे ठेवले. सुष्मिता सेनचे वडील हवाई दलात विंग कमांडर होते आणि आई सुभ्रा ज्वेलरी डिझायनर होती. त्यामुळे त्यांचे स्वप्न होते की सुष्मिता मोठं काहीतरी करेल.

मिस इंडियासोबत मिस युनिव्हर्सचा जिंकला किताब –
1994 हे वर्ष सुष्मिता सेनसाठी खूपच लकी ठरले. या वर्षी तिने मिस इंडिया (Miss India) आणि मिस युनिव्हर्स (Miss Universe) या दोन मोठे अवॉर्ड जिंकले. जेव्हा सुष्मिता सेनने हे दोन्ही अवॉर्ड (Award) जिंकले तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. सुष्मिता सेनला भारताची पहिली महिला मिस युनिव्हर्सचा किताबही मिळाला आहे.

ललित मोदींना करते डेट –
सुष्मिता सेनने कधीही आपले लव्ह लाईफ लपवले नाही. ती नेहमी या गोष्टी उघडपणे ठेवते. आपल्या लव्हलाईफमुळे ती नेमही चर्चेत असते. सुष्मिता सेनने काही महिन्यांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत (Boyfriend Rohman Shawl ) ब्रेकअप केला. जो तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान होता. सध्या ललित मोदी यांना डेट करत आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -