Tuesday, July 8, 2025
Homeमनोरंजनअन्... उर्फी जावेदला मिळालं प्रेम, एक्स-बॉयफ्रेंडच्या नावाच्या स्पर्धकाची केली निवड!

अन्… उर्फी जावेदला मिळालं प्रेम, एक्स-बॉयफ्रेंडच्या नावाच्या स्पर्धकाची केली निवड!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सोशल मीडियाची सेन्सेशन उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. उर्फी जावेदने सनी लिओनच्या स्प्लिट्सव्हिला शोच्या 14व्या सीझनमध्ये सहभाग घेतला आहे. या शोमध्ये उर्फीचा जलवा सर्वांना पाहायला मिळत आहे. उर्फी जावेदने तिच्या बोल्डनेसने गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. या शोच्या पहिल्याच दिवशी राणी बी म्हणून पोरांना भेटायला आलेल्या उर्फीने चमत्कार केला. उर्फी जावेद तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या नावाच्या मुलाची पहिला कनेक्शन म्हणून निवड केली आहे. उर्फी जावेदने कशिश ठाकूरला आपला डेटिंग पार्टनर करत त्याच्यासोबत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. या शोमधील उर्फीच्या एन्ट्रीचा जबरदस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



उर्फी जावेद स्प्लिट्सविलामध्ये अतिशय हुशारीने खेळताना दिसत आहे. उर्फी जावेदने या शोमध्ये पहिला कनेक्शन म्हणून निवड केलेल्या कशिशसमोर अनेक डार्क सिक्रेट्स शेअर केले आहेत. उर्फीने त्याला डायरेक्ट त्याला सांगितले की, ती या शोमध्ये अशा मुलाच्या शोधात आहे जो क्यूट आणि चॉकलेटी असेल. उर्फी जावेद या शोमध्ये कशिश ठाकूरला सांगतो, त्याची स्माइल खूपच क्युट आहे.

स्प्लिट्सविलाच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये उर्फीने तिचे हृदय कशिश ठाकूरच्या हातामध्ये ठेवते. ती त्याला असे सांगते की, ‘मला खूप लवकर प्रेम होते आणि ते ऑलरेडी झाले आहे. मी माझ्या भावना शेअर केल्या आहेत.’ यावर कशिश ठाकूर म्हणतो की, ‘त्याला थोडा वेळ लागतो, तो लगेच प्रेमात पडत नाही.’ या शोमध्ये सध्या उर्फी जावेद सर्वांसाठी आकर्षण ठरत आहे. त्याचसोबत ती प्रेक्षकांचे देखील लक्ष वेधू घेत आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद या शोमध्ये रोडीज एक्सट्रीमचा विजेता कशिश ठाकूरला प्रभावित करण्याचा जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. हा शो जिंकायचाच आहे हे उर्फीने आपल्या मनामध्ये आधीच पक्के केले आहे. हेच कारण आहे की तिने शोमध्ये एन्ट्री करताच अशा अनेक मुलींना मुलांच्या आयलँडवर येण्यापासून रोखले. उर्फी या शोमध्ये अतिशय हुशारीने खेळताना दिसत आहे आणि टीममधील लोकांचे न ऐकता, कोणत्या मुलीला मुलांच्या आयलँडवर येण्यापासून रोखायचे हे ठरवले होते. उर्फी जावेद स्प्लिट्सव्हिलामध्ये दररोज नवनवीन धमाके करताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -