Wednesday, July 9, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या राजकारणात नवी युती; उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर शेवटी एकत्र येणारच?

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी युती; उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर शेवटी एकत्र येणारच?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि लक्षवेधी घडामोड आज पहायला मिळाली आहे. लवकरच महाराष्ट्रात नवी युती पहायला मिळणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर एकत्र येणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका जाहीर कार्यक्रमात तशा प्रकारचे संकेत दिले आहेत.



आंबेडकर आणि आमचं वैचारिक व्यासपीठ एकच आहे. स्वातंत्र्य वाचवण्यासाठी एकत्र येऊयात. प्रबोधनकार डॉट कॉमचा लोकार्पण सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आंबेडकरांसोबत युतीचे संकेत दिले आहेत. मुंबईत आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आले होते. प्रबोधनकार डॉटकॉम या वेबसाईटचं लोकार्पण ठाकरे आणि आंबेडकरांच्या हस्ते झालं.

यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘न्याययंत्रणाही तुम्ही बुडाखाली घेणार का?’, देश हुकुमशाहीच्या दिशेनं जातोय अशी टीका भाजपचं नाव न घेता केली.

आंबेडकर आणि आमची वैचारिक बैठक एकच आहे, स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आपण दोघांनी एकत्र येऊया असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर यांना यावेळी केले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आंबेडकरांसोबत नव्या युतीचे संकेत दिल्याची चर्चा आहे.

प्रकाश आंबेडकरांनी दिला होता युतीचा प्रस्ताव
यापूर्वी देखील प्रकाश आंबेडकर यांनी दोन वेळा उद्धव ठाकरे यांच्याकडे युती संदर्भातील प्रस्ताव दिला होता. यामुळे मागील अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबडेकर यांची शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी याबाबत कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नव्हते. अखेर उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -