भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना आज (22 नोव्हेंबर 2022) होणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. आता भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी हार्दिक पंड्या आणि संघ पुन्हा सज्ज झाला आहे.
भारत- न्यूझीलंड टी-20 मालिकेतील आज होणारा तिसरा सामना न्यूझीलंडमधील नेपियर येथे आज दुपारी 12 वाजता होणार आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकला तर टी-20 मालिका जिंकण्याची संधी भारताला असणार आहे. तर न्यूझीलंडचा संघ मालिकेतील पहिला विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल. आजच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होऊ शकतो.
सामना कुठे पाहता येणार?
टी-20 मालिकेतील आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार असून येथे तुम्हाला सामना पाहता येणार आहे.
आजचा संभाव्य भारतीय संघ :
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.