ताजी बातमी ऑनलाईन टीम
आजरा : अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी आजऱ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा आज, शुक्रवारी जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात नागरिकांचा मोठा सहभाग होता. विशेष करुन महिलाही मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाल्या होत्या. आजरा पंचायत समितीच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. शहराच्या मुख्य भागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराज पुतळ्यासमोर मोर्चा समाप्त होणार आहे.
शहरातील एका हायस्कूलमधील स्नेहसंमेलनानिमित्त आयोजीत सांस्कृतिक कार्यक्रम पाहून एक अल्पवयीन मुलगी घरी जात असताना काही तरुणांनी तिची छेड काढली. या घटनेनंतर आजऱ्यात तणावपूर्ण वातावरण बनले होते. याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी तीन दिवस बंद पाळून आज जनआक्रोश मोर्चाचे काढला आहे.