Tuesday, July 29, 2025
Homeराजकीय घडामोडीनारायण राणे-संजय राऊतांमधला वाद 'अरे तुरे'वर... राऊत म्हणतात तो XXX माणूस

नारायण राणे-संजय राऊतांमधला वाद ‘अरे तुरे’वर… राऊत म्हणतात तो XXX माणूस

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजप नेते नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार कलगितुरा रंगलाय. संजय राऊत यांना पुन्हा जेलवारी घडवणार असा सज्जड इशाराच नारायण राणे यांनी दिलाय. तर शिंदे गटाला सामावून घेण्यासाठी नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार असल्यामुळे त्यांची सटकली आहे. आणि त्यातूनच ते असली विधानं करत असल्याचा पलवटवार राऊतांना केलाय.


काय म्हणाले नारायण राणे?
माझ्याकडे कात्रण असून ती मी वकिलांकडे पाठवून ठेवली आहेत, मी वाचून विसरणारा नाही तर दखल घेणारा आहे, माझा वाईट स्वभाव आहे, 26 तारखेचा अग्रलेख मी जपून ठेवला आहे, संजय राऊतला सोडणार नाही, मी पण त्याच्यावर केस टाकणार असा इशाराच नारायण राणे यांनी दिला आहे. संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांनी टीका केला. संजय राऊत शंभर दिवस आतमध्ये राहिला, त्याला वाटतंय आता परत जावं, मी रस्ता मोकळा करतोय परत जायला असं नारायण राणे यांनी म्हटलंय.

संजय राऊत यांचं प्रत्युत्तर
तर नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांना चक्क पादरा पावट्याची उपमा दिली. तो पादरा माणूस आहे, आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही असं सांगत संजय राऊत यांनीही नारायण राणे यांचा एकेरी उल्लेख केला. हा सर्वांना अरे तुरे करतो, हा कोण आहे, कालपर्यंत एकनाथ शिंदे यांना अरेतुरे करत होता, पंतप्रधान मोदींना अरेतुरे, हे कोण आहेत, याची चौकशी करा, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

हा राऊत विरुद्ध राणे असा वाद नाही, त्याला वेड लागलं आहे, तो वेड्यांच्या कळपात आहे, नारायण राणेची सटकली आहे, मी त्याला कालपर्यंत आदराने उल्लेख करत होतो, जरी तो आमच्यावर टीका करत होता, मी एक शब्द बोललो नाही. कोण आहे हा माणूस, याचं मंत्रिपद जातंय, शिंदे गटाच्या माणसांना सामावून घेण्यासाठी नारायण राणेचं मंत्रिपद जातंय, म्हणून तो भैसाटला आहे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -