Tuesday, July 29, 2025
HomeमनोरंजनBurj Khalifa वर झळकला किंगखान शाहरुखच्या ‘पठाण’ चा ट्रेलर!

Burj Khalifa वर झळकला किंगखान शाहरुखच्या ‘पठाण’ चा ट्रेलर!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

आपल्या अभिनयाच्या जादूने आजही बॉलीवूडचा बादशहा, किंगखान अभिनेता शाहरुख खान याने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. त्याचा बिग बजेट आणि बहुचर्चित असा पठाण हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच हा ट्रेलर दुबईमधील बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला आहे.

पठाण या ऍक्शन चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम हे कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. पठाणमधील बेशरम रंग आणि झुमे ही गाणी प्रदर्शित झाली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

दरम्यान, काल रात्री यश राज फिल्म्सने ट्विटर अकाऊंटवरुन बुर्ज खलिफाचा व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. ‘पठाण ऑन टॉप लिटरली, 25 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर पठाण पाहा. हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस’ अशा प्रकारचे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.

यश राज फिल्म्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या बुर्ज खलिफाच्या या व्हिडीओला 13 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाइक केले आहे. तर चार हजारपेक्षा जास्त युझर्सने या ट्वीटला रिट्वीट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -