Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरउद्धव ठाकरे यांनी हातातला भगवा सोडून हिरवा पकडला: किरीट सोमय्या

उद्धव ठाकरे यांनी हातातला भगवा सोडून हिरवा पकडला: किरीट सोमय्या

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर झालेल्या ईडी कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच जंगी स्वागत केलं असून किरीट सोमय्या आज करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहे.किरीट सोमय्या कोल्हापूर रेल्वे स्थानकावर दाखल होत असताना आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जी काही माफीया गिरी सुरू आहे. हे आता बंद होत असून त्यांच्यावर कारवाई होत आहे काहीजण आत गेले,काहीजण बाहेर आले तर काही जणांवर कारवाई होत आहे.यामुळे यांच्याशी लढण्यासाठी मला शक्ती मिळावे यासाठी मी अंबाबाई चरणी आलो आहे असे सोमय्या म्हणाले आहेत, ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी हातातला भगवा सोडून हिरवा पकडला
गेल्यावेळी मी अंबाबाईच्या दर्शनाला येत होतो मात्र त्यांनी मला अडवलं होत.आता हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे इन्कम टॅक्स यांच्याकडून कारवाई होत आहे. हसन मुश्रीफ म्हणाले भाजप आणि किरीट सोमय्या यांच्याकडून मुस्लिम धर्मातील माझ्यावर नवाब मलिक आणि अस्लम शेख यांच्यावर कारवाई करत आहेत म्हणून आता मुश्रीफ यांना धर्म आठवू लागला आहे.त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी आता देखील सोमय्या यांना कोल्हापुरात येऊ देणार नाही असं म्हटलं होते मात्र आता राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही उद्धव ठाकरे यांनी हातातला भगवा सोडून हिरवा पकडला होता म्हणून तुम्ही मला अडवू शकलात मात्र, आता भाजपचे सरकार आहे आडवून दाखवा असेही यावेळी सोमय्या म्हणाले आहेत.

मोदी सरकारवर कोणीही घोटाळेबाज, माफिया दबाव टाकू शकत नाही

मुश्रीफ यांच्या घरावर कारवाई सुरू असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता याबाबत बोलताना सोमय्या म्हणाले, हे मोदी सरकार आहे आणि मोदी सरकारवर कोणीही घोटाळेबाज,माफिया दबाव टाकू शकत नाही. तसेच न्यायालयाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही मग ते हसन मुश्रीफ असो किंवा नवाब मलिक किंवा मी, माझ्याकडे एखादी तक्रार आली की मी त्याची संबंधित विभागाकडे तक्रार करून त्याचा पाठपुरावा करतो.

तसेच संबंधित विभाग त्यांची चौकशी करून कारवाई करतात.न्यायालय न्याय देतात आणि हे सर्वांना मान्य आहे.तसेच संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी कोणताही अनुभव नसताना बोगस डॉक्टर आणि दवाखाना दाखवून पुणे मुंबई येथे कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट घेतले त्याच्या हलगर्जीपणामुळे अनेक जणांचे मृत्यू झाले, म्हणून मी सुजित पाटकर यांच्या विरोधात न्यायालयात गेलो कारवाई सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला या घोटाळ्याचे कागदपत्र मुंबई महापालिका देत नसल्याने इडी इन्कम टॅक्सला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल बाबत सर्व कागदपत्र द्यावीत असेही यावेळी किरीट सोमय्या म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -