Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगयेत्या 2 दिवसात आणखी घसरणार राज्यातील पारा, या दिवशी पावसाचाही अंदाज

येत्या 2 दिवसात आणखी घसरणार राज्यातील पारा, या दिवशी पावसाचाही अंदाज

हिमालयीन भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट पुन्हा तीव्र झाली आहे. परिणामी पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रातील हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पुढील पाच दिवस देशभरात हवामान खराब राहणार आहे. तर दोन दिवस कडाक्याची थंडी असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात सध्या हिमालयातील पश्चिमी चक्रवातामुळे कुठे कडाक्याची थंडी तर कुठे पाऊस, असं वातावरण आहे. याचाच परिणाम म्हणजे पुढील दोन दिवस उत्तर भारतात कडाक्याची थंडी असणार आहे.

याचाच परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळेल. राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा जोर वाढेल. यासोबत 17 ते 20 जानेवारी या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आा आहे. मुंबईतही गेल्या दोन दिवसांपासून थंडी वाढली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत थंडीचा पारा हा 15 अंश खाली गेला होता. तर, ठाण्यामध्ये 16.2 अंश इतका होता. हिमालयतील बर्फवृष्टी आणि उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट पुन्हा तीव्र झाल्याने पुढील दोन-तीन दिवस मुंबईमध्ये पारा घसरून थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा जानेवारीच्या सुरुवातीपासूनच उत्तरेकडून पश्चिमी चक्रवातांची मालिका सुरू आहे.

त्यामुळे हिमालयीन विभागात यंदा मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तरेकडील राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहून महाराष्ट्रातही येत असल्याने राज्यात थंडी वाढली आहे. जानेवारीच्या सुरूवातीपासून सुरू झालेल्या कडाक्याचा थंडीचा परिणाम राज्यातील प्रत्येक भागात दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुकेही पसरले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -