Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगलीत पाळत ठेवून टाकला दरोडा, आंतरराज्य टोळी जेरबंद; सहा जण फरार

सांगलीत पाळत ठेवून टाकला दरोडा, आंतरराज्य टोळी जेरबंद; सहा जण फरार

शहरातील कर्नाळ रस्त्यावरील बंगल्यावर दरोडा टाकून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले.या दरोड्यात अहमदनगर, औरंगाबाद येथील तीन संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून पाच लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अजून सहा संशयित फरार असून ते मध्य प्रदेशातील असल्याचे पोलिस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

अनिल ऊर्फ अन्या युवरा पिंपळे (वय ४९, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर), तुकाराम भीमराव घोरवडे (५४, रा. उंडे वस्ती, मातापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), दाजी धनराज सोळंके (३६, रा. हरसूल गायरान, लासूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

शहरातील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथे २३ डिसेंबरच्या मध्यरात्री आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यावर दरोडा पडला होता. संशयितांनी आशिष यांचे हात बांधून आईला ठार मारण्याची धमकी देत ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या दरोड्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगली शहर पोलिस ठाण्याची पथके नियुक्त करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने तपास करण्यात आला. खबऱ्यामार्फत हा दरोडा अहमदनगर, औरंगाबाद येथील संशयितांनी केल्याची माहिती मिळाली.

एलसीबीच्या पथकाने श्रीरामपूर पोलिसांच्या मदतीने पिंपळे, घोरवडे, तर औरंगाबाद पोलिसांच्या मदतीने सोळंके याला अटक केली. या गुन्ह्यात आणखी सहा जणांचा समावेश आहे. ते मध्य प्रदेशमधील असून, ९९ ग्रॅम वजनाचे पाच लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. अजून दोन लाखांची रोकड हस्तगत करण्यात येणार असल्याचे अधीक्षक तेली यांनी सांगितले.

पाळत ठेवून दरोडा

अटक केलेल्या तिघांसह सहा जण महाराष्ट्र एक्स्प्रेसने सांगलीत आले. रेल्वे स्थानकावरून ते बसस्थानकात आले. तिथे वेगवेगळे ग्रुप करून घरफोडीसाठी बंगला शोधण्यास सुरुवात केली. दत्तनगर येथील चिंचवाडे यांच्या बंगल्यावर पाळत ठेवली. रात्री नऊ जणांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून आत घुसत चोरी केली.

संशयित एकमेकांचे नातलग

संशयित नऊ दरोडेखोर एकमेकांचे नातेवाईक आहेत. नगर, औरंगाबाद, मध्य प्रदेशमधील नातेवाईक एकत्र येऊन दरोडा टाकत होते. यातील संशयित तुकाराम घोरवडे मध्य प्रदेशमधील साडेसहा वर्षे तुरुंगात होता. आठ महिन्यांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -