Sunday, December 22, 2024
HomeमनोरंजनAishwarya-Sangeeta नाही तर 'ही' अभिनेत्री होती Salman Khan ची पहिली गर्लफ्रेंड, Kiara...

Aishwarya-Sangeeta नाही तर ‘ही’ अभिनेत्री होती Salman Khan ची पहिली गर्लफ्रेंड, Kiara Advani सोबत आहे खास नातं



बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान याच नाव कुठल्या ना कुठल्या अभिनेत्रीसोबत जोडलं जातं. मुंबईत मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी सलमान खान एका तरुणीसोबत दिसून आला. त्यानंतर ती तरुणी कोण आहे अशी चर्चा रंगली. पण आम्ही तुम्हाला सांगता ती सलमान खानची भाची होती. असो, सलमानच्या लव्ह लाइफबद्दल अनेक किस्से आहेत. सगळ्यात जास्त गाजलेलं प्रेम प्रकरण म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचं…पण सलमान खानच्या वाढदिवसला अभिनेत्री संगीता बिजलानी आली त्यावेळी सलमानने तिच्या डोक्यावर किस केली त्यानंतर चाहत्यांचा भुवया उंचावल्या. अनेकांना आजही वाटतं की पहिल्यांदा सलमान खानने संगीता बिजलानीला डेट केलं होतं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटले, सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड कोणी दुसरी होती.



एंटरटेन्मेंट न्यूजनुसार, जेव्हा सलमान खान सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा सल्लूची भेट शाहीन बानोशी झाली. 80-90 च्या काळातील ही प्रसिद्ध अभिनेत्री होती. तुम्हाला ही भेट कोणी घडवली हे ऐकून अजून धक्का बसेल. तर ही भेट कियारा अडवाणी यांची आई यांनी घडवली होती. कियारा अडवाणीची आई ही शाहीन बानोची चुलत बहिण आहे. रिपोर्टनुसार अशी माहिती मिळते की, सलमान खान आणि शाहीन बानो या दोघांनीही ‘मैने प्यार किया’साठी ऑडिशन दिलं होतं. मात्र सलमान खानची निवड झाली आणि शाहीनला नकार देण्यात आला होता.

एंटरटेन्मेंट न्यूजनुसार, 1980 मध्ये मिस इंडिया झालेल्या संगीता बिजलानी आणि सलमान खानची जवळीक वाढली. त्यानंतर शाहीन बानोला या दूर झाल्या.

असं बोलं जातं आहे की, शाहीनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमान आणि संगीता हे दोघे लग्न करणार होते. पुढे संगीता आणि सलमान यांचंही नातं तुटलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -