Friday, March 13, 2026
Homeकोल्हापूरKolhapur : अडीच लाखांचा गंडा घालून मोपेडसह भाडेकरू पसार; नागाव येथील प्रकार

Kolhapur : अडीच लाखांचा गंडा घालून मोपेडसह भाडेकरू पसार; नागाव येथील प्रकार

घरमालकाला अडीच लाखांचा गंडा घालून भाडेकरू पसार झाला आहे. याबाबत नागाव ( ता. हातकणंगले ) येथील घरमालक रामानंद कल्लाप्पा मोरे यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेश अमर पाटील ( वय २९, सद्या रा. नागाव, ता. हातकणंगले. मूळ रा. हनुमान नगर, गडहिंग्लज. असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रामानंद मोरे यांचे नागाव येथे चप्पल विक्रीचे दुकान आहे. शिवाय त्यांच्याकडे सहा भाडेकरू राहत आहेत. यापैकी एक सुरेश पाटील हा दोनच महिन्यापूर्वी राहण्यास आला. आपण एका खाजगी फायनान्स कंपनीत कामाला असल्याचे त्याने सांगितले होते. त्याच्या कंपनीने ३ फेब्रुवारी रोजी एक अॅक्टिवा मोपेड ओढून आणली आहे. नवीनच असणारी ही मोपेड त्याने श्री. मोरे यास साठ हजार रुपयांना विकत दिली. त्यानंतर त्याने आणखीन चार मोपेड असल्याचे सांगितले आणि त्यासाठी आपण अ‍ॅडव्हान्स रक्कम भरली असल्याच्या पावत्या त्याने श्री. मोरे यांना दाखविल्या. सोमवारी त्याने चार मोपेड ताब्यात घेण्यासाठी श्री. मोरे यांच्याकडून रोख दोन लाख रुपये घेतले. ही रक्कम भरण्यासाठी जाणार असल्याचे कारण सांगून त्यांना विकलेली मोपेड घेतली. आणि मोबाईल स्विच ऑफ करुन तो पसार झाला. आर्थिक फसवणूक झाली म्हणून हवालदिल झालेल्या रामानंद मोरे यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेली हकीकत एका तक्रार अर्जावर लिहीली व आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -