Friday, February 7, 2025
Homeराजकीय घडामोडीउद्धव ठाकरेंचे मशाल चिन्हही धोक्यात?; ‘या’ पक्षाचा चिन्ह वापरण्यास विरोध

उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्हही धोक्यात?; ‘या’ पक्षाचा चिन्ह वापरण्यास विरोध

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी एक मोठा निर्णय दिला. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता येणाऱ्या निवडणूकीत मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र, मशाल चिन्हाविरोधातही निवडणूक आयोगात समता पक्षाकडून निवेदन दाखल करण्यात आले आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिलेलं मशाल हे निवडणूक चिन्ह काढून घ्यावं, अशी मागणी समता पक्षाकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

समता पक्षाचे कैलाश कुमार यांनी निवडणूक आयोगाकडे एक निवेदन दिले असून
शिवसेनेला त्यांचं गोठवलेलं धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे त्यांना मशाल चिन्ह देण्याचं कोणतंही कारण राहिलेलं नाही. कारण महाराष्ट्र किंवा इतर दुसऱ्या राज्यात पक्षाला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे आलो आहे. शिवसेनेला त्यांचं धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून मशाल चिन्हा काढून घ्यावं आणि समता पार्टीचं मशाल हे चिन्ह सुरक्षित करावं. आम्ही सातत्याने निवडणुका लढत आहोत. समता पार्टीला जेव्हा 6 टक्के मतदान होईल तेव्हा आम्हाला हे चिन्ह परत मिळावं, अशी मागणी कैलाश कुमार यांनी केली आहे.

दरम्यान, समता पक्षाकडून मागणी करण्यात आल्यानंतर आज दुपारपर्यंत समता पक्षाचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहे. समता पक्षाचे अध्यक्ष उदय मण्डल यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -