Friday, February 7, 2025
Homeमनोरंजनअक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल 'हेराफेरी 3' शिवाय अन्य दोन...

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल ‘हेराफेरी 3’ शिवाय अन्य दोन सिनेमातही दिसणार एकत्र

अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांची धमाकेदार कॉमेडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मात्र अलिकडे ‘हेराफेरी 3’ मध्ये अभिनेता अक्षय कुमार दिसणार नसल्याची बातमी आल्याने चाहते प्रचंड निराश झाले आहेत.
मात्र चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. आता हे त्रिकुट ‘हेराफेरी 3’ मध्ये पुन्हा एकत्र दिसणार आहेत. याव्यतिरिक्त आणखी दोन सिनेमात हे त्रिकुट एकत्र दिसणार आहेत.

अक्षय कुमारने एका कार्यक्रमात तो ‘हेराफेरी 3’ मध्ये नसणार असल्याचे सांगितले होते. हे ऐकून चाहते निराश झाले होते. त्यानंतर अक्षयने ट्विटरवर ट्रेण्ड करायला सुरुवात केली की, अक्षय नाही तर ‘हेराफेरी 3’ नाही. त्यानंतर काही सकारात्मक चर्चा ऐकू येऊ लागल्या आणि रिपोर्टमध्ये हेराफेरीचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांची अक्षयशी भेट झाली आहे. आताच्या ताज्या माहितीनुसार, या त्रिकुटाबाबत चाहत्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे.

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल फक्त ‘हेराफेरी 3′ च नाही तर आणखी दोन सिनेमांच्या सिक्वेलमध्ये एकत्र दिसणार आहेत. बोललं जात आहे की, या त्रिकुटाने नुकतेच मुंबईत खास प्रोमो शूट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी तीन सिनेमांसाठी एकत्र येत असल्याची घोषणा करणार आहेत. वृत्तात सुत्रांचा हवाला देत सांगण्यात आले की, अक्षय, सुनील आणि परेश रावल केवळ हेराफेरीच्या सिक्वेलमध्ये दिसणार नाहीत तर’आवारा पागल दीवाना’ आणि ‘वेलकम’च्या सिक्वेलमध्येही दिसणार आहेत.

हेरा फेरी बरोबरच फिरोज ‘आवारा पागल दीवाना’ आणि ‘वेलकम’चेही निर्माते होते. मात्र वेलकममध्ये सुनील शेट्टीची कोणतीही भूमिका नव्हती. त्यामुळे वेलकममध्ये आता सुनील शेट्टीची एण्ट्री झाल्यावर तो नेमके कोणत्या भूमिकेत दिसेल याबाबत काही सांगता येत नाही. अक्षय आणि परेश रावल यांच्याबरोबर नाना पाटेकर, अनिल कपूरही हेही पॉप्युलर झाले होते. आता सुनील शेट्टीही या कास्टमध्ये सहभागी झाल्यास कॉमेडी डोस आणखी मजबूत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -