ताजी बातमी ऑनलाईन टीम
भाजप नेते केंद्रीय गृह मंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल झाले आहेत. विमानतळावर त्यांचे आगमन झाले असून, ते येथून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी रवाना झाले आहेत. त्याच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धनंजय महाडिकसह रवाना झाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ अजित पवारांना घेऊन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवारांना घेऊन ते मुश्रीफांच्या भेटीला जाणार आहेत. या भेटीमध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेबाबत सर्व ती माहिती देऊन त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निराकरण करणार असल्याचे, त्यांनी पत्रकात म्हटले आहे. कोल्हापूर बँकेतील कथित घोटाळा आणि ईडीच्या कारवाईमुळे भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
पुण्यामध्ये बोलताना अमित शाह यांनी आपल्या भाषणामध्ये सोलापूर,नागपूर आणि कोल्हापूर अशा तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांवर प्रशासक नेमावा लागल्याचा उल्लेख केला आहे.कदाचित यापूर्वी बँकेवर प्रशासक नेमला होता, या संदर्भाने त्यांचे ते वक्तव्य असावे,असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -