इंडियन प्रीमिअर लीग ही टी20 स्पर्धा जगभरातील सर्वोत्तम लीगमध्ये नावाजली गेली आहे. या स्पर्धेचे आतापर्यंत 15 हंगाम पार पडले आहेत. क्रिकेटप्रेमींनीही या लीगला भरभरून प्रेम दिले आहे.आता याच आयपीएल 2023 बद्दल एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुकेश अंबानी ही संपूर्ण स्पर्धा जिओ सिनेमावर मोफत दाखवणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी अंबानींनी तब्बल 2.7 बिलियन डॉलर्स खर्च केले आहेत. या बातमीमुळे आयपीएल प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जिओ सिनेमावर मोफत पाहता येणार आयपीएल 2023 स्पर्धा
डिझ्नी आणि सोनी ग्रूप कॉर्प या प्रतिस्पर्ध्यांना रोखून वायकॉम 18 मीडियाने गेल्या वर्षी 2.7 बिलियन डॉलर्स (जवळपास 24 हजार कोटी) खर्च करत आयपीएल स्ट्रीमिंग हक्क मिळवले होते. वायकॉम 18चे लक्ष आयपीएल स्पर्धेदरम्यान तब्बल 55 कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यावर आहे. 31 मार्चपासून सुरू होणारी ही लीग जवळपास 8 आठवडे चालेल. जिओ सिनेमावर वायकॉम 18च्या युजर्सना आयपीएल 2023 स्पर्धा मोफत पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, ही स्पर्धा 4K रिझोल्युशनमध्ये पाहता येईल. यापूर्वी डिझ्नी प्लस हॉटस्टारकडे आयपीएल स्ट्रीमिंगचे हक्क होते, आणि आयपीएल पाहण्यासाठी पैसे मोजावे लागायचे. मात्र, आता पैसे मोजावे लागणार नाहीत. जिओ युजर्सना कोणत्याही इंटरनेट जोडलेल्या उपकरणावर कितीही वेळ कोणताही खेळ पाहता येईल.
रिलायन्स कंपनीने प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत कोट्यवधी ग्राहकांना खूपच कमी किमतीत मोबाईल सेवा देत प्रतिस्पर्ध्यांना डच्चू दिला. मुकेश अंबानी यांच्या समूहाकडे रिलायन्स जिओची मालकी आहे. ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर कंपनी आहे. या कंपनीचे 40 कोटींहून अधिक ग्राहक आहेत.
आयपीएल 2023
आता मुकेश अंबानी यांनी प्रेक्षकांसाठी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धा मोफत पाहण्याची सुविधा दिल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. आता प्रेक्षक कुठल्याही इंटरनेट कनेक्शन जोडलेल्या उपकरणावर सामने पाहू शकतील. आयपीएलबाबत बोलायचं झालं, तर या हंगामाला पुढील महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण 70 सामने पार पडतील, जे 10 संघांमध्ये खेळले जातील.
एकूण डबल हेडर 18
स्पर्धेत एकूण डबल हेडर (एका दिवशी दोन) सामने 18 असणार आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक संघ घरच्या मैदानावर प्रत्येकी 7 सामने खेळेल. तसेच, उर्वरित 7 सामने विरोधी संघाच्या मैदानावर खेळले जातील.