Wednesday, July 30, 2025
Homeक्रीडाऑस्ट्रेलिया आज पुन्हा भारताच स्वप्न मोडणार का? रेकॉर्डचे भीतीदायक आकडे

ऑस्ट्रेलिया आज पुन्हा भारताच स्वप्न मोडणार का? रेकॉर्डचे भीतीदायक आकडे

T20 वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये आज टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. भारतीय महिला टीमसाठी हे चॅलेंज सोपं नसेल. कारण क्रिकेटच्या या फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलियाच पारडं भारतापेक्षा वरचढ आहे. मागच्या दोन मोठ्या टुर्नामेंटमध्ये भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच फायनलमध्ये पराभव झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत 30 T20 सामने झाले आहेत. यात 30 पैकी 22 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. T20 वर्ल्ड कपमध्येही ऑस्ट्रेलियाची बाजू भारतापेक्षा सरस वाटत आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाची टीम पाचवेळा आमने-सामने आली आहे. ऑस्ट्रेलिय़ाने पाच पैकी तीन सामने जिंकले आहेत. फक्त दोनवेळाच भारताला विजय मिळवता आलाय.

ऑस्ट्रेलियामुळे स्वप्न मोडलं

मागच्या तीन वर्षात भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन टुर्नामेंटच्या फायनलमध्ये पराभव झाला आहे. मागच्यावर्षी कॉमनवेल्थ गेम्सच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं. तेच मागच्या T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानेच भारताच चॅम्पियन बनण्याच स्वप्न भंग केलं होतं.

मॅच किती वाजता सुरु होणार?

मॅचला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 6 वाजता टॉस होणार आहे. या निर्णायक सामन्यात टॉसची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. या सामन्याचं आयोजन हे केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचं अंतिम फेरीत पोहण्याचा आणि ऑस्ट्रेलियाचा मागील पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -