तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हाती आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. यामध्ये Xiaomi, Redmi आणि Poco ब्रँडचा फोन वापरणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.जर तुम्हीही या ब्रँडचे स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला लवकरच नवीन ऑपरेटिंग सिस्टम मिळणार आहे.
शाओमी गेल्या काही दिवसांपासून कस्टम स्किन मीयूआयवर काम करत आहे. कंपनी आपल्या युजर्ससाठी नव्या मीयुआयसह काही नवीन फीचर्स रोलआउट करणार आहे.कंपनीने याबाबतची अधिकृत घोषणा केली असून 27 फेब्रुवारी 2023 रोजी मीयुआय 14 लाँच केलं जाईल. मीयुआय 14 अँड्रॉईड 13 वर आधारित आहे. एमयुआय 14 च्या एक दिवस आधी म्हणजेच 26 फेब्रुवारीला शाओमी भारतीय बाजारात नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे.यामुळे हा स्मार्टफोन मीयुआय 14 ला सपोर्ट करणारा असेल, अशी आशा आहे. कंपनीचा हा पहिलाच फोन असेल जो लेटेस्ट मीयुआय 14 सह बाजारात लाँच केला जाईल.
शाओमीने आपल्या ऑपरेटिंग सिस्टम मीयुआय 14 च्या युजर्स इंटरफेससोबत काही बदल केले आहेत. अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टमपासून मीयुआय विकसित करण्यात येतं. नव्या मीयुआयमुळे फास्ट आणि क्रिप्स अॅनिमेशन, इन बिल्ट अॅप्संना नवा लूक मिळेल. एकूणच काय तर नव्या मीयुआय शाओमी स्मार्टफोन युजर्संना नवा अनुभव मिळेल. शाओमीनं ऑगस्ट 2010 मध्ये मीयुआय या युजर इंटरफेसचं पहिलं अपडेट जारी केलं होतं. त्यानंतर अँड्रॉइड ज्या पध्दतीने विकसित होत गेले. त्याच शाओमीनं मीयुआयच्या माध्यमातून ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड केली. आता 2023 असून मीयुआच्या माध्यमातून 14 वं अपडेट आहे.
शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये मिळतील अपडेट
Xiaomi 12 Pro
Xiaomi 11i
Mi 11 Ultra
Xiaomi Pad 5
Xiaomi 11i Hypercharge
Mi 11X Pro
Mi 11X
Xiaomi 11 Lite NE 5G
Mi 11 Lite
पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये मिळतील अपडेट
Poco M4 Pro 5G
Poco F3 GT
Poco X4 Pro 5G
Poco M4 Pro
Poco F4
Poco M4
रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये मिळतील अपडेट
Redmi Note 12 Pro
Redmi 10 Prime (2022)
Redmi 10 Prime
Redmi 9T
Redmi 10A
Redmi 10 Power
Redmi K50i
Redmi Note 10 Pro Max
Redmi Note 10 Pro
Redmi Note 11