Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगसतर्क राहा, NIA कडून मुंबई पोलिसांना ई-मेल; मुंबईत धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचाही...

सतर्क राहा, NIA कडून मुंबई पोलिसांना ई-मेल; मुंबईत धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचाही उल्लेख

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा ई-मेल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत सध्या एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये असल्याचं कळत आहे. सरफराज मेमन असं या व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती परदेशात प्रशिक्षण घेऊन आलेली असून धोकादायक असल्याने सतर्क राहावं अशा सूचना एनआयएने केल्याचं कळत आहे. त्यानंतर आता राज्यातल्या तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मुंबईत एक धोकादायक व्यक्ती फिरत असून त्यासंदर्भात माहिती देणारा ई-मेल एनआयएकडून मुंबई पोलिसांना करण्यात आला आहे. NIA कडून मुंबई पोलिसांनी पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये सतर्क राहण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. एनआयएकडून ई-मेल आल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मुंबईत फिरत असलेली संशयित धोकादायक व्यक्ती इंदूरची राहणारी असून या व्यक्तीने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतली आहे. त्यामुळे ही व्यक्ती खूपच धोकादायक ठरु शकते, असंही एनआयएने म्हटलं आहे. एनआयकडून मुंबई पोलिसांना करण्यात आलेल्या ई-मेलमध्ये या संशयित व्यक्तीची कागदपत्रही पाठवली आहेत. मेलसोबत NIA ने आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि एलसी कॉपीही जोडल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांसोबतही संवाद साधत सविस्तर माहिती दिली आहे.

मुंबईतील सुरक्षा वाढवली

मुंबई कायमच दहशतवाद्यांचे लक्ष्य असतं. 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या काही वर्षात आपल्या सुरक्षा यंत्रणांनी मुंबईसारख्या शहरांचं दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण केलं आहे. मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ताजमहाल पॅलेस हॉटेल, ताज लॅण्ड्स एंड हॉटेल, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, मंत्रालय, मुंबईसह उच्च न्यायालय आणि इतर महत्वाच्या आस्थापनांसह सुरक्षा वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -