Saturday, August 2, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : केखलेत तरुणाची आत्महत्या,परिसरात हळहळ

कोल्हापूर : केखलेत तरुणाची आत्महत्या,परिसरात हळहळ

केखले ता. पन्हाळा येथील तरुण पोपट रामचंद्र निकम (वय ३८) यांनी राहत्या घरी नॉयलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली या घटनेची नोंद कोडोली पोलीसात झाली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पोपट हा सकाळी लवकर उठून शेतात पाणी पाजण्यासाठी गेला होता. घरातील सर्व शेतात गेल्यावर तो परत घरी आला . घरी कोणी नाही पाहून त्याने राहत्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चुलती, चुलतभाऊ असा परिवार आहे. या घटनेनंतर केखले परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. कोडोली पोलीस ठाण्याचे सपोनी शितलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सागर कुंभार तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -