Wednesday, July 30, 2025
Homeक्रीडावानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांचा उभारणार पुतळा; मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय

वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांचा उभारणार पुतळा; मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय

क्रिकेटचा देव अशी ओळख असणारा भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा 24 एप्रिल रोजी 50 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांचा पूर्णा कृती पुतळा उभारण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून घेण्यात आला आहे.2014 मध्ये भारत सरकारकडून सचिन तेंडुलकर यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला होता.

सचिनने 16 नोव्हेंबर 2013 रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. यावेळी त्याने आपल्या गुरुजनांपासून ते क्रिकेटमधील सहकाऱ्यांपर्यंत सर्वांचे आभार मानले होते. सचिन तेंडुलकर याने आपल्या दमदार खेळीच्या जोरावर क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड स्थापन केले जे अजूनही कोणी तोडू शकले नाहीत. त्यामुळे आता मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी वानखेडे स्टेडीयममध्ये सचिन तेंडुलकर यांचा पूर्णा कृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

काय म्हणाले अमोल काळे?

‘वानखेडे स्टेडियमवर हा पहिलाच पुतळा असेल, तो कुठे ठेवायचा हे ठरवायचे आहे. सचिन तेंडुलकर एक भारतरत्न आहे. त्याने क्रिकेटसाठी काय केले हे सर्वांना माहीत आहे.
तो 50 वर्षांचा झाल्यावर हे MCA कडून कौतुकाची भेट असेल.
मी तीन आठवड्यांपूर्वी त्याच्याशी बोललो आणि त्याची संमती घेतली.’ असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे म्हणाले आहेत. सचिनच्या 50 व्या वाढदिवशी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -