कसबा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणत ही पेठ आमची, ती पेठ आमची म्हणत होते मात्र, आज सर्व पेठा कोसळल्या. कारण इतके दिवस शिवसेना सोबत होती म्हणून तुम्ही जिंकत होता आता कोणता मिंदे येणार नाही.ही शिवसेना खोक्याने विकत घेता येणार नाही.हे आज पुण्यातील निकालावरुन दिसलं. आमच्या खांद्यावर बसून तुम्ही आला. मात्र आता याच खांद्यावर तुमची तिरडी काढणार असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप, शिंदे गटाला दिला. तुम्हाला आम्हाला संपवता येणार नाही. पण आजचा निकाल हा तुमच्या छाताड्यवरच पाहिलं पाऊल आहे. एकनाथ शिंदे सुद्धा हरणार. ठाणे शिवसेनेचं तेथील महापालिकेत ही शिवसेनेचच झेंडा फडकणार. ही शिवसेना खोक्याने विकत घेता येणार नाही.टरबूज आज कसब्यात फुटलं अस म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 2024 साली कळेल राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान कोण होणार.मग बघू कोण ईडी,कोण सीबीआय.मला अटक केली पण येताना मी त्यांना 2024 ला भेटू असे म्हणून आलो असल्याचेही ते म्हणाले.
नारायण राणे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, त्याच टिल्लू पोरगं मला धमकी देताय सभेत याची सेक्युरिटी काढा म्हणून. पण, तुझ सरकर आहे काढ ना.कोकणात शिवसैनिक आले की तू लपून बसला होता. इकडे धैर्यशील याचे नाव धैर्यशील कोणी ठेवले.याच्यात काहीही धैर्य नाही. माझ्यासारखा सभ्य माणूस कोणी नाही.मी 40 जनांना चोर म्हणाल म्हणून चोरांचा अपमान झाल्याचे लोकांनी म्हटले.चोरांचे देखील तत्त्व असते.चोरांचा अपमान झाला म्हणून मी त्यांची माफी मागतो.2019 साली अमित शहा आणि उधव ठाकरेमध्ये अग्ग्रिमेंट झाली. आणि त्याचं काय झाल हे फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री पदासह सत्तेचा वापर समसमान होईल. मात्र नंतर पलटी मारली, अशी नाराजीही व्यक्त केली.
सिलेंडरच्या भाव वाढीविषयी बोलताना ते म्हणाले की,महागाईवर कोणी आता काही बोलत नाही. काल सिलेंडर 50 रुपयांनी वाढले.कुठे गेल्या त्या स्मृती बाई त्यांना शोधा.तुमच्या खात्यातील पैसे काढून धैर्यशील मानेला 50 खोके दिले. दिवार सिनेमा प्रमाणे या गद्दाराच्या घरच्यांना ही कपाळावर मेरा बाप गद्दार म्हणून घेऊन फिराव लागेल. पुढे जाऊन भाजप देखील यांना उमेदवारी देणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.