भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्याकडून माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरुच आहेत. कुठल्या बिळात लपलात, वाघाचं काळीज असेल तर बिळातून बाहेर या, असे म्हणत त्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना पुन्हा एकदा थेट आव्हान दिलं आहे. कागल तालुक्यातील सावर्डे खुर्दमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन व बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमात त्यांनी मुश्रीफांवर तोफ डागली. समरजित यांच्याकडून आव्हानाची भाषा झाल्याने पुन्हा एकदा वादामध्ये ठिणगी पडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमदार हसन मुश्रीफ आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे.
कुठल्या बिळात लपलात, वाघाचं काळीज असेल तर बिळातून बाहेर या; समरजित घाटगेंकडून हसन मुश्रीफांना थेट आव्हान
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -