Tuesday, August 26, 2025
Homeक्रीडामुंबईचा सलग दुसरा विजय, आरसीबीवर 9 विकेट्सने मात

मुंबईचा सलग दुसरा विजय, आरसीबीवर 9 विकेट्सने मात

वूमन्स प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्स टीमने सलग दुसरा विजय मिळवला आहे. मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.आरसीबीने मुंबईला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 1 विकेटच्या मोबदल्यात 14.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. तसेच आरसीबीचा हा या मोसमातील सलग दुसरा पराभव ठरला.

हॅली मॅथ्यूज आणि नॅट ब्रंट या दोघी मुंबईच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. या दोघींनी नाबाद 114 धावांची शतकी विजयी भागीदारी केली. या दरम्यान दोघींनी वैयक्तिक अर्धशतकंही पूर्ण केली. हॅलीने 38 बॉलमध्ये 13 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने झंझावाती 77 धावांची नाबाद खेळी केली. तर नॅटने 29 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने नॉट आऊट 55 रन्स केल्या. बंगळुरुकडून प्रीती बोस हीने एकमेव विकेट घेतली.

आरसीबीची बॅटिंग

त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. आरसीबीचा डाव 18.4 ओव्हरमध्ये 155 धावांवर आटोपला. आरसीबीकडून कॅप्टन स्मृती मंधाना आणि श्रेयांका पाटील या दोघींनी प्रत्येकी 23 धावांची खेळी केली. तर मुंबईकडून हॅली मॅथ्यूजने 3 विकेट्स घेतल्या.

आरसीबीकडून सर्वाधिक रिचा घोष हीने 28 धावा केल्या. स्मृती आणि श्रेयांका या दोघींनी प्रत्येकी 23 धावांचं योगदान दिलं. कनिका आहुजा 22 रन्स करुन माघारी परतली. तर मेगन शूट हीने 20 धावा केल्या. सोफी डिवाइन हीने 16 तर एलिस पॅरीने 13 धावा जोडल्या. आरसीबीच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजांना हात खोलून दिले नाहीत.

मुंबईच्या हॅली मॅथ्यूजचा अपवाद वगळता साईका इशाक आणि अमेलिया केर या दोघींनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर नॅट ब्रंट आणि पूजा वस्त्राकर या जोडीने 1 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

मुंबईचा सलग दुसरा विजय

पलटणचा हा या मोसमातील सलग दुसरा विजय ठरला. मुंबईने आरसीबीआधी हंगामातील सलामीच्या सामन्यात गुजरात जायंट्सवर 143 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्लेइंग इलेव्हन | स्मृति मंधना (कॅप्टन), दिशा कसाट, एलिस पॅरी, सोफी डिवाइन, रिचा घोष, हेदर नाइट, श्रेयंका पाटिल, कनिका आहूजा, मेगन शूट, रेणुका सिंह आणि प्रीति बोस

मुंबई इंडियंस प्लेइंग इलेवन | हरमनप्रीत कौर (कर्णधार) यास्तिका भाटिया, हॅली मॅथ्यूज, नॅट ब्रंट, अमेलिया केर, हुमैरा काजी, पूजा वस्त्राकर, इजी वॉन्ग, कालिता आणि सायका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -