Tuesday, July 8, 2025
Homeराजकीय घडामोडीउद्धव ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार; शिंदे गटातील 'या' नेत्याच्या होम ग्राउंडवर होणार...

उद्धव ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार; शिंदे गटातील ‘या’ नेत्याच्या होम ग्राउंडवर होणार जाहीर सभा !

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता तब्बल आठ महिने पूर्ण होताहेत. सत्ता संघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे असं वाटत असताना अद्याप निकाल येणं बाकी आहे. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यात ठीक ठिकाणी सभा देखील घेतल्या.यानंतर आता उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरून ठीक-ठिकाणी जाहीर सभा घेताना दिसत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरे थेट शिंदे गटात सामील झालेल्या नेत्यांच्या होम ग्राउंडवर सभा घेत आहेत. नुकतंच, 5 मार्चला ठाकरे यांनी रत्नागिरी मधील खेडमध्ये जाहीर सभा घेत सत्ताधारी नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं होत.

सध्या उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रात मॅरेथॉन जाहीर सभा होणार असल्याचं सांगण्यात आला आहे. कोकणताली खेडनंतर येत्या 26 मार्चला मालेगावात ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात ठाकरे यांच्या सभा होत आहे. ठाकरे गट अधिक आक्रमक झाला असून राज्यात पुन्हा सत्ता आणण्याचा निर्धार केला आहे. तसेच, आगामी कोल्हापूर, पुणे , मुंबई, नाशिक, कोल्हापूर , अमरावती या ठिकाणी कार्यक्रमाच्या तारखा पंधरा तारखेला आम्ही जाहीर करु. असं देखील ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -