Saturday, July 27, 2024
Homeबिजनेसकोका कोला झाला स्वस्त! रिलायन्सच्या एंट्रीने खेळ बिघडवला

कोका कोला झाला स्वस्त! रिलायन्सच्या एंट्रीने खेळ बिघडवला

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आपला व्यवसाय सतत वाढवत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी कोला मार्केटमध्ये एन्ट्री करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली होती आणि रिलायन्सकडून 70 च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड कॅम्पा कोलाचे तीन फ्लेवर्स लॉन्च करण्याची घोषणा करून होळीनंतर बाजारात जोरदार एंट्री केली.यानंतर कोला मार्केटमध्ये प्राइस वॉर सुरू झाले असून इतर कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे.

कॅम्पा कोला डील रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने 2022 मध्ये प्युअर ड्रिंक ग्रुपकडून 22 कोटी रुपयांना केली होती. या करारानंतर होळीला कॅम्पा कोला हा 50 वर्ष जुना आयकॉनिक पेय ब्रँड ऑरेंज, लेमन आणि कोला फ्लेवर्समध्ये लाॅंच करण्यात आला आहे. त्याची थेट स्पर्धा बाजारात आधीच अस्तित्वात असलेल्या पेप्सी, कोका-कोला आणि स्प्राईटशी आहे.

कॅम्पा कोलाचे तीन फ्लेवर्स लाँच केल्यानंतर कोला मार्केटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या इतर कंपन्यांवर दबाव येऊ लागला आहे. दरम्यान, तापमानात झालेली वाढ आणि शीतपेयांच्या मागणीत झालेली वाढ यामुळे कोका-कोलाने आपल्या उत्पादनांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोका-कोला कंपनीच्या किंमती कमी करण्याच्या निर्णयानंतर, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये 200 एमएलच्या बाटलीची किंमत 15 रुपये होती, ती आता 10 रुपये झाली आहे. यासह, कोका कोलाच्या काचेच्या बाटल्या ठेवण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांद्वारे भरलेले क्रेट डिपॉझिट देखील माफ केले गेले आहे, जे साधारणपणे 50 ते 100 रुपयांच्या दरम्यान असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -