Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रनैसर्गिक आपत्तीमधील मृतांच्या कुटुंबाला मिळणार 4 लाख रुपये!

नैसर्गिक आपत्तीमधील मृतांच्या कुटुंबाला मिळणार 4 लाख रुपये!

महापूर, चक्रीवादळ, भूकंप, आग, त्सुनामी यासह विविध 12 नैसर्गिक आपत्तींमधील बाधितांसाठी केंद्र सरकारकडून सुधारित निकष व आर्थिक मदतीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. 2022 ते 2026 या कालावधिसाठी पर्यंत ते लागू असणार आहेत. त्यानुसार आपत्तीमध्ये मृत झालेल्याच्या कुटूंबाला 4 लाख ऊपये मिळणार आहेत. राज्य सरकारकडून याची अंमलबजावणी होणार आहे.

राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी सुरू करण्यात आला आहे. यामध्ये निधीमध्ये केंद्र सरकारकडून 75 टक्के व राज्य सरकारकडून 25 टक्के पैसे दिले जातात. या निधीमधून मदतीच्या वाटपासाठी विविध बाबी व मदतीचे दर,अटी, शर्ती केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामधील निकष व मदतीच्या दरामध्ये आता नव्याने सुधारणा 2022 ते 2026 पर्यंत ते लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने 1 नोव्हेंबर 2022 पासूनच लागू करण्यासास मान्यता दिली आहे.

सुधारित मदतीच्या निकष व अनुदानाच्या दरानुसार आपत्तीमध्ये मृत झालेल्याच्या कुटूंबाला 4 लाख रूपये मिळणार आहेत. त्याचबरोबर आपत्तीमध्ये डोळे किंवा इतर अवयव निकामी झालेल्यांना 74 हजारांपासून अडीच लाख रूपयांपर्यंत अर्थसहाय्य, आपत्तीमध्ये जखमी उपचारासाठी इस्पितळात दाखल असल्यास 5400 ते 16000 ऊपये मिळणार आहे. महापुरामध्ये शेतजमिनीवर गाळ किंवा मातीचा थर 3 इंचापेक्षा जास्त असल्यास प्रति हेक्टर 18000 ऊपये, शेती पिकाच्या नुकसानीमध्ये कोरडवाहून क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 8,500 रूपये व आश्वासित जलसिंचन योजनेतील क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 17000 ऊपये, बहुवार्षिक पिसांसाठी प्रति हेक्टरी 22, 500 रूपये, रेशीम उत्पादनाच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 6000 ऊपये ते 7,500 ऊपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

दुधाळ जनावरे दगावल्यास 4000 पासून 37000 रूपयांपर्यंत, ओढकाम करणारी जनावरे दगावल्यास 20000 रूपयांपासून 32000 रूपयांपर्यंत आर्थिक सहाय्यक मिळणार आहे. आपत्तीमध्ये बाधित होणार्या विजेच्या प्रति खांबासाठी 5000 रूपये, बाधित कंडक्टरसाटी 50000 ऊपये व बाधित ट्रान्स्फार्मरसाठी 1 लाख ऊपये मिळणार आहेत. यासह रस्ते, पूल दुरूस्तीसह प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर बाबींसाठीही हे सुधारित निकष व दर लागू असणार आहेत.

बाधित घरासाठी 1 लाख 20 हजार ऊपये
नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होऊन पडझड झालेल्या सखल भागातील पक्क्या घरासाठी 1 लाख 20 हजार ऊपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. त्याचबरोबर डोंगरी भागातील कच्च्या घरांसाठी 1 लाख 30 हजार रूपये, पडझड झालेल्या झोपड्यांसाठी प्रति झोपडी 8000 रूपये, अंशत: पडझड झालेल्या पक्क्या घरांसाठी प्रति घर 6,500 ऊपये व कच्च्या घरांसाठी प्रति घर 4000 ऊपये, घराला जोडून असलेल्या गोठ्यासाठी प्रति गोठा 3000 रूपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -