Monday, February 24, 2025
Homeक्रीडाबेन स्टोक्सवर १६.२५ कोटी रुपये उधळणाऱ्या सीएसकेला मोठा धक्का

बेन स्टोक्सवर १६.२५ कोटी रुपये उधळणाऱ्या सीएसकेला मोठा धक्का

चेन्नई सुपर किंग्ज अर्थात सीएसकेने आयपीएल लिलावात बेन स्टोक्सला १६.२५ कोटी रुपये देऊन आपल्या संघात सामील करुन घेतले होते. कारण तो आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सामने जिंकू देईल, परंतु सध्या एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला मोठा धक्का बसला आहे. याचे कारण म्हणजे बेन स्टोक्स, जो आयपीएल २०२३ च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळणार आहे.

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, बेन स्टोक्सच्या डाव्या गुडघ्याला झालेली दुखापत बरी करण्यासाठी कोर्टिसोनचे इंजेक्शन देण्यात आले आहे. अशा स्थितीत त्याला गोलंदाजी करता येणार नाही. चेन्नई सुपर किंग्जच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या बेन स्टोक्सने संघासोबत सराव सुरू केला आहे. तो पहिल्या सामन्यापासून संघाकडून खेळताना दिसणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसीने क्रिकइन्फो आणि पीए न्यूजला सांगितले की, माझ्या मते तो सुरुवातीपासूनच फलंदाज म्हणून खेळण्यास तयार आहे. गोलंदाजीसाठी वाट बघावी लागू शकते. मला माहित आहे की त्याने काल (रविवार) थोडी गोलंदाजी केली. कारण त्याच्या गुडघ्यात इंजेक्शन देण्यात आले होते. त्याच्यासाठी चेन्नई आणि ईसीबी फिजिओ एकत्र काम करत आहेत.आयपीएल २०२३ चा उद्घाटन सामनाच चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना आहे. कारण ३१ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सीएसकेचा संघ गतविजेत्या गुजरात जायंट्सशी भिडणार आहे. बेन स्टोक्स अनेक वर्षांपासून त्याच्या डाव्या गुडघ्याला वारंवार होणाऱ्या दुखापतींशी झुंज देत आहे, परंतु गेल्या महिन्यात इंग्लंडच्या न्यूझीलंड दौऱ्यात दुखापत पुन्हा बळावली. दोन कसोटी सामन्यांत तो केवळ नऊ षटके गोलंदाजी करु शकला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -