Saturday, January 24, 2026
Homeकोल्हापूरपुणे – बंगळूर महामार्गावर कराडच्या कोल्हापूर नाक्यावर कारचा विचित्र अपघात

पुणे – बंगळूर महामार्गावर कराडच्या कोल्हापूर नाक्यावर कारचा विचित्र अपघात

पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावर एक भरधाव वेगाने जाणारी कार पलटी होऊन विचित्र अपघात झाला. मंगळवारी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सद्या पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी महामार्गावर वाहने धीम्या गतीने जाण्यासाठी बॅरीगेट्स लावण्यात आलेले आहेत. दिवसा या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. मात्र, रात्रीच्यावेळी कमी असते. दरम्यान, मंगळवारी रात्रीच्या सुमारास येथील कोल्हापूर नाक्यावर एक विचित्र अपघाताची घटना घतली.

महामार्गावरून कार (क्रमांक MH 12 EK 4113) मधून
काही युवक निघाले होते. यावेळी कारमधील युवकाने कार पळवण्याचा प्रयत्न केला. या कार पळवण्याचा नादात कोल्हापूर नाक्यावरती पलटी झाली. कार पलटी होताच महामार्गावरील वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली. यावेळी या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ अपघात पलटी झालेली कार महामार्गावरून बाजूला केली. यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. या पलटी झालेल्या कारमध्ये दोन ते तीन युवक असल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -