Wednesday, July 30, 2025
Homeसांगलीद्राक्षव्यापाऱ्याला मारहाण करून 1 कोटी 9 लाख लुटणारी टोळी जेरबंद!

द्राक्षव्यापाऱ्याला मारहाण करून 1 कोटी 9 लाख लुटणारी टोळी जेरबंद!

तासगाव शहरातील गणेश कॉलनीत द्राक्ष व्यापाऱ्य़ाला लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. याप्रकरणी मतकुणकी (ता. तासगाव) येथील तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कारवाईत १ कोटी ९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली.

पोलिसांनी दिलेले अधिक माहिती अशी…तासगावमध्ये महेश शितलदास केवलानी या द्राक्ष व्यापाऱ्याच्या स्कार्पिओ गाडीच्या आडवी गाडी लावून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी आणलेल्या पैसे लुटीचा अवघ्या काही तासात छडा लावण्यात सांगली पोलिसांच्या एलसीबी पथकाला यश आले आहे.

नितीन खंडू यलमार (वय २२), विकास मारुती पाटील (वय ३२) व अजित राजेंद्र पाटील (वय २२) सर्वजण रा. मतकुणकी, ता. तासगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिन्ही आरोपी तासगाव तालुक्यातील मतकुणकीमधील आहेत. सांगली एलसीबीने अवघ्या आठ तासांमध्ये तिघांना जेरबंद करत एक कोटी नऊ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. द्राक्ष दलाल मुळचा नाशिकचा असून सध्या तासगावमधील गणेश कॉलनीत राहण्यास होते. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सर्वत्र नाकाबंदी करत आरोपींच्या शोधासाठी पथके तैनात केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -