10 वी पास ते इंजिनियर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत कार्यालयीन परिचर, कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांची निवड कोणतीही परीक्षा न घेता थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांनी दि. 05 आणि 11 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
संस्था – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
एकूण पदसंख्या – 3
भरली जाणारी पदे –
कार्यालयीन परिचर – 02 पदे
कनिष्ठ संशोधन फेलो – 1 पद
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 05 & 11 एप्रिल 2023 (पदांनुसार)
मुलाखतीचा पत्ता –
कनिष्ठ संशोधन फेलो पदासाठी अल्कोहोल तंत्रज्ञान आणि जैवइंधन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे याठिकाणी मुलाखत घेण्यात येईल. तर कार्यालयीन परिचर पदासाठी प्रशासन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे मुलाखतीस हजर राहावं लागेल.
मुलाखतीची तारीख – 05 & 11 एप्रिल 2023 (पदांनुसार)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
कार्यालयीन परिचर – 10th Class Pass.
कनिष्ठ संशोधन फेलो – M.Sc. (Microbiology/ Biotechnology) with GATE/M. Tech (Biotechnology/Biochemical Engineering)with GATE
निवड प्रक्रिया –
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी मूळ गुणपत्रिका/प्रमाणपत्रे, प्रशस्तिपत्रके आणि अनुभव प्रमाणपत्रे प्रमाणित प्रतींसोबत आणावीत.
वॉक-इन-सिलेक्शनमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
संस्थेच्या निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.
अधिकृत वेबसाईट – www.vsisugar.com