आयपीएल 2023 च्या ओपनिंग मॅचमध्ये एम एस धोनीची चेन्नई सुपरकिंग्स आणि हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्समध्ये रंगतदार सामना पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही टीम्स आमने-सामने असतील. टॉस संध्याकाळी 7 वाजता उडवला जाईल. त्याआधी पुष्मा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि गायक अरिजीत सिंह यांचा धमाकेदार परफॉर्मन्स होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता आयपीएलची ओपनिंग सेरेमनी सुरु होणार आहे.
ओपनिंग सेरेमनीमध्ये रश्मिक मंदाना, तमन्ना भाटिया, सिंगर अरिजीत सिंह परफॉर्म करणार आहे. सेरेमनी 45 मिनिट चालेलं. सेरेमनीआधी तम्मना आणि रश्मिक प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झाल्या होत्या. आयपीएलने आपल्या टि्वटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तमन्ना ग्रुप प्रॅक्टिस करताना दिसतेय.
ओपनिंग सेरेमनीआधी रश्मिका आणि तमन्ना दोघींनी आपल्या तयारीची माहिती दिली. अरिजीत आणि मंदानासोबत परफॉर्म करण्याची मी प्रतिक्षा करत होते, असं तमन्नाने सांगितलं. तिने आपल्या फेव्हरेट क्रिकेटर्सची सुद्धा नाव सांगितली. तमन्नाने एमएस धोनी आणि विराट कोहली फेव्हर क्रिकेटर असल्याच सांगितलं.
रश्मिकाला तिच्या फेव्हरेट क्रिकेटर्सची नाव विचारण्यात आली. तिने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्टार कोहलीच नाव घेतलं. मंदाना सुद्धा आयपीएलबद्दल खूप उत्साहात आहे. सेरेमनीआधी तिची एक्साइटमेंट स्पष्टपणे दिसून आली.