Wednesday, July 23, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची शासनाकडून चौकशी

कोल्हापुरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची शासनाकडून चौकशी

कोल्हापूर येथील एका नामवंत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची चौकशी करण्यासाठी येथे आज सकाळी आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक धडकले आहे. या हॉस्पिटलबाबत शासनाकडे थेट तक्रार करण्यात आल्या असून यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने शासन स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करुन या समितीमार्फत ही चौकशी करण्यात येत आहे.

या चौकशी समितीमधे आरोग्य विभागातील मुंबई, पुणे व कोल्हापूर मधील सचिव व तत्सम स्तरावरील अधिकारी आहेत. यासंदर्भात हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला चौकशीची नोटीस बजावली असून कोल्हापूरमधील आरोग्य विभागाच्या कार्यालयात ही चौकशी इनकॅमेरा होणार असून त्यासंदर्भात कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे. शासनाच्या योजनांचा लाभ देताना त्यात काही गैरप्रकार झाल्यात का याविषयी चौकशी होणार असल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -