आयपीएल 16 व्या मोसमाला धडाक्यात सुरुवात झाली. आतापर्यतं यशस्वीपणे 8 सामने पार पडले. इमपॅक्ट प्लेअर, वाईड- नो बॉल रिव्हीव्यू यासारख्या नव्या नियमांमुळे या मोसमात नवी रंगत पाहायला मिळतेय. तसेच जिओ सिनेमावर एकूण 12 भाषांमध्ये सामना पाहता पाहता आपल्या भाषेत कमेंट्री ऐकण्याची चाहत्यांची सोय करण्यात आलीय. त्यामुळे गेल्या 15 मोसमांच्या तुलनेत हा 16 वा हंगाम वरचढ ठरलाय. आतापर्यंत सर्व काही निट सुरु होत. मात्र क्रिकेट चाहत्यांना ज्याची भीती होती तेच झालंय. आयपीएलवर कोरोनाचं सावट आहे. यामुळे एकूण 10 संघाना महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. आता या आदेशांमुळे काही दिवसांनी हा मोसमही अर्ध्यात स्थगित होणार का, अशी भीती क्रिकेट चाहत्यांमध्ये पाहायला मिळतेय.
मिळालेल्या माहितानुसार, आयपीएल संघाच्या मालकांनी खेळाडूंना हॉटेलच्या रुममधून वारंवार न निघण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय सॅनिटायजर आणि मास्कचा उपयोग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शहरात कोरोनाचा धोका सद्यपरिस्थितीत जास्त आहे तिथे खबरदारीचे आदेश फ्रँचायजींकडून टीमला देण्यात आले आहेत. तर सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप बीसीसीआयकडून कोरोनाबाबत काहीही आदेश देण्यात आलेले नाहीत.
आयपीएलमध्ये विविध देशांमधील खेळाडू सहभागी झाले आहेत. खेळाडूंव्यतिरिक्त सपोर्ट स्टाफची संख्याही जास्त आहेत. भारतातील वविध राज्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे आयपीएलवरही कोरोनाचं सावट आहे.
देशात गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार 435 जणांना कोरोनाची बाधा झाली. तसेच कोरोनामुळे गेल्या 24 तासात छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, ओडिशा आणि पंजाबमध्ये अनुक्रमे प्रत्येकी 1 जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आयपीएलमध्ये कोरोनाची एन्ट्री
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि आयपीएलमध्ये समालोचन करत असलेला आकाश चोप्रा यालाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. मला कोरोनाने क्लिन बोल्ड केलंय. अशी माहिती स्वत आकाश चोप्रा याने दिली होती.