Tuesday, August 5, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात चोरांचा धुमाकूळ सुरुच; रात्रीत तीन घरफोड्या, निवृत्त पोलिसाच्या घरावरही मारला डल्ला 

कोल्हापुरात चोरांचा धुमाकूळ सुरुच; रात्रीत तीन घरफोड्या, निवृत्त पोलिसाच्या घरावरही मारला डल्ला 


कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच आहे. गेल्या 24 तासात करवीर तालुक्यात तीन घरफोड्या घडल्या. चोरट्यांकडून बंद घरांना टार्गेट केलं जात आहे. सशस्त्र दरोडा, चेन स्नॅचिंग तसेच घरफोड्यांसह कोल्हापुरात गुन्ह्यांची सलग मालिका सुरु आहे. कोल्हापूर शहरासह, करवीर, कागल आणि आजरा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सलग चोऱ्या झाल्या आहेत. आजरा तालुक्यातील खानापुरात आठ दिवसांपूर्वी सशस्त्र दरोडा पडला होता. 

करवीर तालुक्यामधील नागदेववाडीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल तीन लाख 26 हजार रुपयांच्या दागिन्यांसह 25 हजारांची रोकड लांबवली. या घटनेची नोंद करवीर पोलिस स्थानकात झाली आहे. सुलोचना किरण कांबळे यांनी चोरीची फिर्याद करवीर पोलिस ठाण्यात दिली. सुलोचना यांचे पती पोलिस दलातून निवृत्त झाले आहेत. सध्या त्या घरी एकट्याच असून आईला पाहण्यासाठी गावी गेल्या होत्या. परतून घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार समोर आला. 

उचगावमध्ये बंद घरात कडीकोयंडे उचकटून चोरट्यांनी प्रवेश करत बाबूराव शंकर चव्हाण यांच्या घरातून रोख रकमेसह एक लाख 61 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. अन्य एका घटनेत उचगावमध्येच संदीप पांडुरंग पाटील यांच्या घरातून रोख रकमेसह 32 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. मंगळवारी मध्यरात्री या दोन्ही चोरी झाल्या.  चोरांनी  या घटना मंगळवारी (ता. 18) मध्यरात्रीच्या सुमारास घडल्या.

या घरफोड्या ताज्या असताना दोन दिवसांपूर्वीच कागल शहरात दत्तनगरमधील बंद घराला लक्ष्य करताना चोरट्यांनी तब्बल साडे सतरा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. तसेच रोख अडीच लाखही पळवून नेले. शंकर कृष्णात घाटगे यांचे औषध दुकान असून ते कुटुबीयांसह बाहेरगावी गेल्यानंतर15 एप्रिलच्या मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ही चोरी होण्याअगोदर याच भागात आणखी तीन चोरी झाल्या होत्या. 

दरम्यान, आठ दिवसांपूर्वीच आजरा तालुक्यातील खानापुरात 15 ते 20 जणांच्या टोळीनं तलवारी नाचवत शेतातील घरात सशस्त्र दरोडा टाकला होता. खानापूर गावच्या माजी सरपंच पूनम प्रल्हाद गुरव यांच्या शेतातील घरावर हा दरोडा पडला. तलवारीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी 220 पाळीव डुक्करं, सोनं, तयार काजूगर, काजू बी, रोकड यांसह नऊ लाखांचा मुद्देमाल लुटून नेला. गुरव दाम्पत्याला हात पाय बांधून तलवारीचा धाक दाखवून लूट केली होती. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -