Thursday, February 6, 2025
Homeक्रीडाShubhman Gill | सारा अली खान की सारा तेंडुलकर, शुभमनच्या आयुष्यात नक्की...

Shubhman Gill | सारा अली खान की सारा तेंडुलकर, शुभमनच्या आयुष्यात नक्की कोण? हार्दिक पंड्या स्पष्टच म्हणाला…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटर शुभमन गिल याच्या नावाची चर्चा अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर यांच्यासोबत रंगत आहे. पण शुभमन नक्की कोणत्या साराला डेट करत आहे.. यावर तिघांपैकी कोणीही मौन सोडलेलं नाही. पण सोशल मीडियावर शुभमनचे दोन्ही सारासोबत असलेले फोटो मात्र तुफान व्हायलर होत असतात. दरम्यान शुभमन आणि सारा अली खान यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केल्याच्या चर्चा रंगल्या.. यावर दोघांकडे विचारणा देखील करण्यात आली . पण दोघांनी देखील विषय टाळला… महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावरून सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपचा अंदाज वर्तवण्यात येतो…

मिळालेल्या माहितीनुसार, सारा अली खान आणि शुभमन गिल यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. सोशल मीडिया कमेंट आणि लाईक्सच्या माध्यमातून सेलिब्रिटींच्या नात्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. पण आता सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये क्रिकेटर हार्दिक पंड्या याच्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे…

शिवाय शुभमनच्या आयुष्यात नक्की कोणती सारा आहे.. याचा अंदाज देखील चाहते बांधत आहे.. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शुभमन याने नवी कार घेतल्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. फोटो पाहिल्यानंतर सारा तेंडुलकर हिने शुभमनचं कमेंटच्या माध्यमातून अभिनंदन केलं. पुढे शुभमन याने सारा तेंडुलकरचे आभार देखील मानले…

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -