Friday, February 7, 2025
Homeअध्यात्मMasik Shivratri 2023 : आज मासिक शिवरात्री, या सोप्या उपायाने होईल शत्रूचा...

Masik Shivratri 2023 : आज मासिक शिवरात्री, या सोप्या उपायाने होईल शत्रूचा नाश

दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील मासिक शिवरात्रीचे व्रत (Shivratri Vrat) आज, शुक्रवार, 16 जून 2023 रोजी पाळण्यात येणार आहे. मासिक शिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि गौरी मातेची पूजा केल्याने त्यांचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो. मासिक शिवरात्रीचे व्रत हे शत्रूंचा नाश करणारे, अखंड सौभाग्य देणारे आणि योग्य वर देणारे आहे.

म्हणूनच लोकं मासिक शिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाची पूजा करतात, अभिषेक करतात आणि उपाय करतातआषाढ मासिक शिवरात्री 2023 शुभ मुहूर्त
मराठी दिनदर्शिकेनुसार, जेष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तारीख 16 जून 2023 शुक्रवारी सकाळी 08.39 पासून सुरू होईल आणि 17 जून 2023 रोजी शनिवारी सकाळी 09.11 वाजता समाप्त होईल. प्रदोष काळात मासिक शिवरात्रीची पूजा करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आषाढ मासिक शिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा असल्याने मासिक शिवरात्रीची तारीख 16 जून मानली जाईल. यासोबतच मासिक शिवरात्रीला धृती नावाचा शुभ योगही तयार होत आहे.

मासिक शिवरात्रीला भोलेनाथाच्या पूजेची वेळ – 16-17 जूनच्या मध्यरात्री 12:02 ते 12:42 पर्यंत.
प्रदोष काल – 16 जूनच्या संध्याकाळी 05:36 ते 07:21 पर्यंत असेल.
धृती योग – 16 जून 2023 च्या पहाटे 02:03 ते 16-17 जून 2023 च्या मध्यरात्री 01:23 पर्यंत राहील. भूमीपूजा, पायाभरणी आणि नवीन बांधकाम सुरू करण्यासाठी धृती योग शुभ मानला जातो.
मासिक शिवरात्री उपाय
शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि प्रत्येक कार्यात यश मिळविण्यासाठी आशीर्वाद मिळविण्यासाठी मासिक शिवरात्रीचा दिवस महत्त्वाचा आहे. यासाठी मासिक शिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाचा जलाभिषेक करावा. यानंतर तुपाचा दिवा लावून भगवान शिवाच्या ‘ओम शन शन शिवाय शन शन कुरु कुरु ओम’ या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमच्या शत्रूंचा लवकरच पराभव होईल. यासोबतच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -