Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंगगळ्याला ओढणी गुंडाळून B.Com च्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

गळ्याला ओढणी गुंडाळून B.Com च्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

आजाराला कंटाळून 23 वर्षीय युवतीनं राहत्या घरात ओढणीनं गळफास लावून आत्महत्या केली. शिवाजी नगर खानापूर इथं रविवारी ही घटना घडली आहे.रोहिणी रामचंद्र चोपडे (Rohini Chopde) असं आत्महत्या केलेल्या युवतीचं नाव असून दुपारच्या दरम्यान घरी कोणी नसताना युवतीनं गळफास लावून आत्महत्या केली आई शेतीकडं तर भाऊ कामावर गेला होता.

भाऊ कामावरून घरी आला, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा अनेकदा ठोठावूनही रोहिणीनं दरवाजा न उघडल्यानं भावानं छतावर चढून छतावरील कौले काढून आत डोकावून पाहिलं असता, रोहिणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.खानापूर पोलीस ठाण्यात (Khanapur Police) या घटनेची नोंद करण्यात आली आहे. बी कॉम. पर्यंतचं शिक्षण घेतलेली रोहिणी खानापुरात मेडिकल शाॅपमध्ये काम करत होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -