Thursday, November 27, 2025
Homeब्रेकिंगस्वस्तात करा देवदर्शन: ‘आयआरसीटीसी’ने लॉन्च केले 7 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी स्वस्त पॅकेज, वाचा...

स्वस्तात करा देवदर्शन: ‘आयआरसीटीसी’ने लॉन्च केले 7 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी स्वस्त पॅकेज, वाचा या पॅकेजचे तिकीट दर आणि वेळापत्रक

भारतीय रेल्वेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सोयी सुविधा प्रवाशांना पुरविण्यात येत असून भारतीय रेल्वेच्या माध्यमातून पर्यटनाच्या हौस असलेल्या पर्यटकांसाठी स्वस्त असलेल्या टूर पॅकेज मध्ये भारतातील अनेक ठिकाणाची सैर देखील घडवून आणण्यात येत आहे. याकरिता भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून आकर्षक अशा पॅकेजमध्ये भारतातील अनेक पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळांना भेटी देण्याची सुवर्णसंधी प्रवाशांसाठी रेल्वेने उपलब्ध करून दिलेली आहे.

या अंतर्गत भारतातील विविध पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांचे टूर पॅकेज देखील आय आर सी टी सी ने आणले आहे. यामध्ये आता बारा ज्योतिर्लिंगांपैकी सात ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी देखील एक पॅकेज लॉन्च केले असून त्यासह इतर धार्मिक स्थळांना भेट देण्याची देखील संधी मिळणार आहे.भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून सात ज्योतिर्लिंग दर्शन

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आयआरसीटीसी कडून प्रवाशांना स्वस्तामध्ये सात ज्योतिर्लिंग आणि इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देण्याची संधी दिली असून त्यासाठी एक खास पॅकेज देखील लॉन्च केले आहे. या अंतर्गत प्रवाशांना स्टॅच्यू ऑफ युनिटी, सात ज्योतिर्लिंग आणि शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाची सुवर्णसंधी मिळणार असून या ट्रेनचा प्रवास मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर रेल्वे स्टेशन पासून सुरु होणार आहे. जबलपूर येथून नरसिंगपूर, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, शुजालपूर, उज्जैन, देवास, इंदूर आणि रतलाम स्टेशन वरून या ट्रेनमध्ये चढता किंवा उतरता येणार आहे. भारत गौरव ट्रेनचा हा प्रवास 18 जुलै 2023 रोजी जबलपूर रेल्वे स्टेशन पासून सुरू होणार आहे.या अंतर्गत असलेले डेस्टिनेशन

या पॅकेजेच्या अंतर्गत द्वारका, सोमनाथ, नासिक, शिर्डी, छत्रपती संभाजी नगर, परळी, परभणी, पुणे आणि केवडिया या ठिकाणी भेट देता येणार असून हा प्रवासाचा कालावधी अकरा दिवस आणि दहा रात्री असा असणार आहे. यामध्ये स्लीपर साठी प्रतिव्यक्ती भाडे हे 19300 असून थर्ड एसी मध्ये प्रवास केला तर प्रति व्यक्तीस 31 हजार पाचशे रुपये तिकीट दर असणार आहे.यामध्ये नाश्ता तसेच दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मिळणार आहे.धार्मिक स्थळांना देता येईल भेट

या टूर अंतर्गत द्वारका या ठिकाणी द्वारकाधीश मंदिर, बेट द्वारका मंदिर आणि नागेश्वर महादेव ज्योतिर्लिंग मंदिर,सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर, त्र्यंबकेश्वर शिव ज्योतिर्लिंग मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असलेली घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, परळी या ठिकाणी असलेले परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, परभणी जिल्ह्यात असलेल्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग आणि पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि त्यासोबतच केवडिया या ठिकाणी असलेले स्टॅच्यू ऑफ युनिटी इत्यादी महत्त्वपूर्ण ठिकाणांना भेटी देता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -