Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात शिरोलीतील एक तरुण ठार, दोन जखमी

कोल्हापूर: पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात शिरोलीतील एक तरुण ठार, दोन जखमी

कोल्हापूर: पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिये फाटा येथे अज्ञात वाहन आणि मोटरसायकलची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात पुलाची शिरोली (ता.हातकणंगले) येथील एक तरुण ठार तर दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघातात मयत झालेल्या तरूणाचे नाव प्रशांत संभाजी कांबळे (वय 22) असे आहे. तर गणेश देवदास समुद्रे, ओमकार बाबासो समुद्रे जखमींची नावे आहेत. जखमींवर कोल्हापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील हे तिघे आपल्या मोटरसायकलने (क्र. एम एच ०९ बीजे ४६१७) सादळे मादळे कडून शिरोलीकडे येत होते. या दरम्यान समोरच्या अज्ञात वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने ते वाहनाच्या मागील बाजूस जोराची धडक होऊन या धडकेत प्रशांत जागिच ठार झाला तर दोघेजण रस्त्यावर पड्याने ते जखमी झाले. या आपघाताची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरा झाली.

प्रशांत हा शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका खाजगी कंपनीत फॅब्रिकेशनचे काम करत होता. प्रशांतला पाच विवाहीत बहीणी, आई, वडील असा परिवार आहे. प्रशांत याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्याच्या या अपघाती निधनाने शिरोली गावात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -