Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरKolhapur News : कोल्हापुरात एकादशी दिवशीच मायलेकाचा धक्कादायक मृत्यू!

Kolhapur News : कोल्हापुरात एकादशी दिवशीच मायलेकाचा धक्कादायक मृत्यू!

उशिरा आगमन झालेल्या मान्सूनने राज्यात जोर पकडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस कोसळत आहे. शेतकऱ्यांची पेरणीची लगबगही सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे.

शेतातील विजांच्या ताराचा स्पर्श होवून मायलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळ्यातील नेबापुरात घडली आहे. नंदा मगदूम व अजय मुगदुम अशी मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत. आषाढी एकादशी दिवशीच अशी दुर्दैवी घटना घडल्याने पन्हाळा तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मगदूम मायलेक आज सकाळी जगताप नावाच्या शेतामध्ये गेले असता रानात अस्थाव्यस्त पडलेल्या वीजांच्या तारांना त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेमुळे नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा मन हेलावून टाकणारा होता. त्यामुळे महावितरणचा गलथान कारभार उघड झाला असून महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे दोघांचा बळी गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल महिनाभर उशिराने मान्सून सक्रिय झाल्यानंतरही शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी किंचित सरी असाच प्रकार गेल्या आठवडाभरापासून सुरु झाला आहे.

पेरणीयोग्य पुरेसा पाऊस होत नसल्याने पेरण्या अजूनही खोळंबल्या आहेत. कोल्हापूर विभागात ऊस वगळून खरीप पिकाखालील क्षेत्र 7.28 लाख हेक्टर आहे. 21 जूनपर्यंत अवघ्या 0.23 लाख हेक्टरवर म्हणजेच आकड्यात सांगायचं झाल्यास 3.18 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून पेरण्यांनी वेग घेतला असला, तरी पुरेशा पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यात पावसाने दमदार सलामी दिली आहे. मात्र, उर्वरित जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, केवळ तुरळक पद्धतीचा पाऊस होत असल्याने परिणामी पेरणीयोग्य ओल जमिनीत न झाल्याने पेरणी करायची कशी, असा प्रश्‍न शेतकऱ्‍यांना पडला आहे. दुसऱ्‍या बाजूला वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनात घट येण्याची चिंता शेतकऱ्‍यांमध्ये आहे. यामुळे शेतकरी निसर्गाच्या चक्रव्युहात अडकला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -