ताजी बातमी ऑनलाईन टीम
अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याशिवाय छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे, भाजप सरकारमध्ये पहिली महिला मंत्री म्हणून अदिती तटकरे यांनी शपथ घेतली आहे. महिला मंत्री नाही म्हणून शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती.
आजच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेससोबत असे शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले. आजचा शपथविधी हा लोटस ऑपरेशन असल्याचंही राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. ज्यांनी शपथ घेतली ती त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचंही शरद पवार यांनी म्हंटलं.
हा तर ऑपरेशन लोटसचा भाग
आजच्या शपथविधीला अजित पवार यांच्यासोबत असलेल्यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. अजित पवार यांच्यासोबत ३० ते ४० राष्ट्रवादीचे आमदार सोबत आहेत. तरीही हा ऑपरेशन लोटसचा भाग असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय.
या आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -