Sunday, September 8, 2024
Homeइचलकरंजीमहानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सुचना!

महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सुचना!

कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरात उद्भवलेल्या मागील काही वर्षातील महापूराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार संभाव्य महापुर व अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले होते.

संभाव्य महापूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नव्याने खरेदी केलेल्या फ्लोटिंग डॉकचे पुजन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागामार्फत पंचगंगा नदीघाट येथे प्रात्यक्षिकाचे (मॉकड्रिल) सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर आपत्कालीन विभागाकडे उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीची सविस्तर माहिती आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे यांनी प्रात्यक्षिकांसह दिली. त्यामध्ये यांत्रिक बोट, साधी फायबर बोट, स्टिल कटर, वुड कटर, लाईफ जॅकेट, रिफ्लेक्टीव्ह जॅकेट, लाईफ रिंग, दोर, मेगा फोन, गळ, ट्यूब, इमर्जन्सी महानगरपालिकेच्यावतीने आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून माहिती घेताना आयुक्त ओमप्रकाश दिवटे व इतर अधिकारी. लॅम्प, स्नेक हँगर, टॉर्च, स्लायडिंग शिडी, बायनाक्युलर इत्यादी साहित्य तसेच फायर बुलेट, फायर फायटर, रुग्णवाहिका, हायड्रोलिक प्लॅटफार्म, औषध फवारणी ट्रॅक्टर, सक्शन ट्रॅक्टर याचा समावेश आहे.सर्व यंत्रसामग्री सुस्थितीत असल्याची माहिती प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी घेत महापूराची परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी
अचूक नियोजन करण्याच्या सुचना दिल्या.

याप्रसंगी उपायुक्त तैमूर मुलाणी, सहा आयुक्त केतन गुजर, संजय बागडे, सुभाष देशपांडे, डॉ. सुनिलदत्त संगेवार, दिलीप हराळे, सौरभ साळुंखे, राजेंद्र मिरगे, सचिन पाटील, नितिन बनगे, अभय शिरोलीकर, बाजी कांबळे, सुनिल बेलेकर, उमाजी कणसे, सुरज माळगे यांच्यासह गणेश बरगाले, तेजोनिधी रेस्क्यू फोर्स, पोलिस बॉईज सदस्य, व्हाईट आर्मीचे शाहीर जावळे, लक्ष्मी प्रोसेसची रुग्णवाहिका तसेच महापुराच्या काळात महानगरपालिका प्रशासनास अत्यंत महत्त्वपुर्ण असे सहकार्य करणारे शहरातील पट्टीचे पोहणारे, तसेच प्राणी मित्र उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -